मुंबई : राज्यात शुक्रवारी काेराेनाच्या ६ हजार १८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आतापर्यंत काेरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८ हजार ५५० झाली आहे. तर, ८७ हजार ९६९ एवढे सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात शुक्रवारी ४,०८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८५ मृत्यूंची नाेंद झाली. आजपर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार ६२७ बाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्के आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५९ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ४६ हजार ८९८ लोकांना काेरोनामुळे जीव गमवावा लागला.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०६ लाख ३५ हजार ६०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ०८ हजार ५५० म्हणजेच १७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.