मुंबई : राज्यात गुरुवारी ९,१९५ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर २५२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात ८,६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख २८ हजार ५३५ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासलेल्या ४ कोटी १८ लाख ७५ हजार २१७ नमुन्यांपैकी ६० लाख ७० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी एकूण १ लाख १६ हजार ६६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६० लाख ७० हजार ५९९ झाली आहे.