देवस्थानांद्वारे उभारली डायलिसिस सेंटर्स, धर्मादाय आयुक्तांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:59 AM2018-12-04T04:59:58+5:302018-12-04T05:00:06+5:30

धर्मादाय संस्था आणि देवस्थानांच्या माध्यमातून राज्यभरात २६ डायलिसीस सेंटर उभारण्यात आली आहेत.

Dialysis Centers, charity commissioner's initiative organized by Devasthanas | देवस्थानांद्वारे उभारली डायलिसिस सेंटर्स, धर्मादाय आयुक्तांचा पुढाकार

देवस्थानांद्वारे उभारली डायलिसिस सेंटर्स, धर्मादाय आयुक्तांचा पुढाकार

Next

- गौरीशंकर घाळे
मुंबई : धर्मादाय संस्था आणि देवस्थानांच्या माध्यमातून राज्यभरात २६ डायलिसीस सेंटर उभारण्यात आली आहेत. दुर्गम तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मादाय आयुक्तालयाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत किंवा नाममात्र दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती. धर्मादाय संस्था तसेच विविध देवस्थानांकडील अतिरिक्त निधीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात किमान एक डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम राबविण्यात आला. आतापर्यंत राज्यभरात २६ डायलिसिस सेंटर कार्यरत झाली असून महिनाभरात आणखी पाच सेंटर सुरू होणार आहेत. जिल्हा स्तरावरील धर्मादाय रूग्णालये व खासगी रूग्णालयांच्या सहकार्याने जिल्हा अथवा तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर उभारण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांनी दिल्या होत्या.
>राज्यभरात २६ सेंटर सुरू
सध्या पालघर, चंद्रपूर, धुळे, वैजापूर, किनवट, वाशिम, उमरगा, रत्नागिरी, आंबेजोगाई, लातूर, पुसद, बुलडाणा, परळी-वैजनाथ, मुरुड, उदगीर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, ठाणे, मुंबई आदी ठिकाणी एकूण २६ सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.

Web Title: Dialysis Centers, charity commissioner's initiative organized by Devasthanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.