Join us

हिरे व्यापाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:33 AM

कटिंग आणि पॉलिशिंग करण्यासाठी घेतलेले लाखोंचे हिरे परत न करता, एका ठगाने गिरगावातील व्यापा-याला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 मुंबई - कटिंग आणि पॉलिशिंग करण्यासाठी घेतलेले लाखोंचे हिरे परत न करता, एका ठगाने गिरगावातील व्यापाºयाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून बीकेसी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव चौपाटी येथील सराफ हाउसमध्ये मुकेश बाबुलाल शहा हे हिरेव्यापारी कुटुंबासोबत राहातात. कच्चे हिरे विकत घेऊन त्यांना कटिंग व पालिशिंग करून विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायिक ओळखीतून कमलेश मोफतलाल मेहता यांना सुमारे ४0 ते ५0 लाख रुपये किमतीचे ८४२.२0 कॅरेटचे हिरे कटिंग व पालिशिंग करण्यासाठी दिले होते. मात्र, मेहता याने हिरे परत केले नाही. मेहता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने शहा यांनी बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.भा.दं.वि. कलम ४०६ आणि ४२0 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबईगुन्हा