दादरच्या फूल विक्रेत्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:32 AM2018-07-12T06:32:52+5:302018-07-12T06:33:42+5:30

 The diamond retailers do not have the comfort of the High Court | दादरच्या फूल विक्रेत्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही

दादरच्या फूल विक्रेत्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही

Next

मुंबई : मंदिर परिसरात फुले व पूजेचे सामान विकण्याची परवानगी मिळावी, यासाठी दादरच्या सेनापती बापट मार्ग
व एम. सी. जावळे मार्गावरील फूल विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने हा परिसर दादर रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात येत असल्याने, फूल विक्रेत्यांना अंतरिम दिलासा देण्यास बुधवारी नकार दिला. त्यामुळे सुमारे १५० विक्रेत्यांना या परिसरातून आपला व्यवसाय हलवावा लागणार आहे.
१ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने आझाद हॉकर्स युनियन विरुद्ध केंद्र सरकार या केसमध्ये मंदिराच्या १०० मीटर परिसरात विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली. मात्र, फुले व पूजेचे सामान विक्रेत्यांना यामधून सूट दिली. याचाच
आधार घेत, बॉम्बे हॉकर्स युनियनने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती.
शिवाजी पोलीस ठाण्यातील पोलीस फूल व पूजेचे साहित्य विक्रेत्यांची छळवणूक करत आहेत. हनुमान मंदिराच्या १०० मीटर परिसरात याचिकाकर्त्या संघटनेचे विक्रेते त्यांच्या व्यवसाय करत आहेत. मात्र, पोलीस त्यांना शांततेच व्यवसाय
करून देत नाहीत. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलीस पैशांची मागणी करतात. त्यांनी मागितलेली रक्कम
दिली नाही की ते छळवणूक करतात, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
राज्य सरकारने अद्याप तरी संबंधित कायद्यांतर्गत कोणतीही योजना अधिसूचित केलेली नाही. त्याचा फायदा पोलीस घेत आहेत.
पोलीस विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या जागेवरून हटवित आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलिसांना विक्रेत्यांना त्यांच्या जागेवरून न हटविण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे म्हटले. ‘उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर २०१७च्या आदेशात मंदिराच्या १०० मीटर परिसरात फूल व पूजेचे सामान विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली असली, तरी
याचिकाकर्त्यांचे सदस्य व्यवसाय करत असलेले ठिकाण दादर स्टेशनच्या १५० मीटर अंतरात येते. उच्च
न्यायालयाच्या आधीच्याच आदेशात रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात व्यवसाय करण्यास मनाई केली आहे,’
असे न्यायालयाने म्हटले.

व्यवसायाची जागा बदलावी लागणार

‘मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या जवळील परिसराची स्थिती
पाहता, याचिकाकर्त्यांची ही विनंती मान्य करणे शक्य नाही,’ असे म्हणत
न्यायालयाने याचिकाकर्त्या संघटनेला अंतरिम दिलासा देण्यास नकार
दिला. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे दादरच्या सेनापती बापट मार्ग
व एम. सी. जावळे मार्गावरील सुमारे १५० फूल व पूजेचे साहित्य
विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाची जागा बदलावी लागणार आहे.

Web Title:  The diamond retailers do not have the comfort of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.