लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंगावर कीडा पडल्याचे सांगत, व्यापाऱ्याचे लाखो रुपये किमतीचे हिरे चोरल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला मालमत्ता कक्षाने अटक केली. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या ६ वर पोहचली आहे.
बोरीवली परिसरातील हिरे व्यापारी सागर शहा (३८) हे १३ एप्रिल रोज़ी कामानिमित्त बसने प्रवास करत असताना, आरोपींनी अंगावर किडा पडल्याचे सांगून, त्यांच्याकडील हिऱ्यांची बॅग पळवली. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत, पोलिसांनी तपास सुरू केला. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानेही समांतर तपास सुरू केला. मालमत्ता कक्षाने यापूर्वी याप्रकरणात अनिल गायकवाड, विशाल गायकवाड, जब्बार शेख, संजय दळवी आणि रफीक अली यांना अटक केली. त्यापाठोपाठ आणखी एका आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. हे सर्वजण अभिलेखावरील आरोपी आहेत.
.......................................