जास्त किंमत दाखवून हिऱ्यांचा व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 03:35 AM2018-07-15T03:35:21+5:302018-07-15T03:35:24+5:30

महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) भारत डायमंड बोर्स या कंपनीने केलेले २ हजार कोटी रुपयांचे मनी लॉड्रिंग रॅकेट उघडकीस आणले व चार आरोपींना अटक केली आहे.

Diamond trade with a higher price | जास्त किंमत दाखवून हिऱ्यांचा व्यापार

जास्त किंमत दाखवून हिऱ्यांचा व्यापार

googlenewsNext

मुंबई : महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) भारत डायमंड बोर्स या कंपनीने केलेले २ हजार कोटी रुपयांचे मनी लॉड्रिंग रॅकेट उघडकीस आणले व चार आरोपींना अटक केली आहे.
कमी दर्जाच्या हिºयांची किंमत जास्त दाखवून, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वांद्रे-कुर्ला संकुलातील बीडीबीच्या कार्यालयावर डीआरआयने छापे मारले होते. व्यापाºयांनी १५६ कोटी रुपये किंमत दाखवून हा व्यवहार केला होता. प्रत्यक्षात अत्यंत सुमार दर्जाच्या या हिºयांची किंमत अवघी १ कोटी २० लाख होती. या हिºयांचा दर्जा तज्ज्ञांकडून तपासल्यानंतर ही माहिती समोर आली. हाँगकाँग व दुबईसारख्या विदेशातून हे कच्चे हिरे आयात केले होते. त्यांची किंमत फुगवून केलेल्या व्यवहारातून २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून १० लाख रुपयांची रोख रक्कम, २ कोटी २० लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट, चेकबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे. हिºयांचा दर्जा तपासणाºया काही सदस्यांना हाताशी धरून असे प्रकार केले जात असल्याचा अंदाज आहे.
बीडीबीचे उपाध्यक्ष मेहुल शाह यांनी अशा प्रकारे करण्यात आलेल्या व्यवहाराबाबत धक्का बसल्याचे मत व्यक्त केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींबाबत हिरे व्यापारी अनभिज्ञ असून, हिºयांचा दर्जा तपासणारे म्हणून त्यांची ओळख नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असताना त्यांच्याकडे हिºयांचा दर्जा तपासण्याचे काम कसे आले, याबाबत संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमचे वर्तुळ छोटे असून, एकमेकांसोबत आमचा संवाद असतो. हे व्यापारी सीमाशुल्क विभागासोबत काम करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रत्यक्षात आमच्या व्यापाºयांना त्यांच्यासोबत काम करण्याची परवानगी नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकारामध्ये कोणत्याही व्यापाराचा हात नसल्याचे सांगण्यात आले.
हिरे व्यापाºयांची संघटना असलेले जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. आमच्या संघटनेचे सदस्य नसलेल्या काही जणांच्या गटाकडून जेम्स व ज्वेलरी उत्पादनांचा वापर करून, मनी लॉन्ड्रिंग केले जात असल्याची घटना दुर्दैवी आहे.
>या व्यवसायावर ६ हजारांपेक्षा अधिक व्यापारी व ५० लाखांपेक्षा अधिक व्यक्ती अवलंबून आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही चुकीचे कृत्य होऊ नये, यासाठी पुढाकार घेऊन असे गैरप्रकार करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी ‘जीजेईपीसी’ने सरकारकडे केली आहे. हाँगकाँग येथून मोठ्या प्रमाणात होणाºया संशयास्पद आयातीबाबत आम्ही सरकारला वेळोवेळी माहिती दिली असून, आमचे सदस्य जागल्याची भूमिका बजावत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सरकारने केवळ जीजेईपीसीला हिºयांचा दर्जा ठरविण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी सरकारकडे करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

Web Title: Diamond trade with a higher price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.