उच्च न्यायालयाचा नगरसेवकाला दणका
By admin | Published: July 24, 2016 03:26 AM2016-07-24T03:26:40+5:302016-07-24T03:26:40+5:30
विक्रोळी नाल्याच्या स्वच्छतेस अथडळा ठरणारे बेकायदेशीर बांधकाम हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला. हे बांधकाम विक्रोळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे
मुंबई : विक्रोळी नाल्याच्या स्वच्छतेस अथडळा ठरणारे बेकायदेशीर बांधकाम हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला. हे बांधकाम विक्रोळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हरुन खान यांचे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे खान यांना दणका बसला.
विक्रोळी नाल्याजवळ बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात येत असल्याने येथील रहिवासी नदीम कपूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनु केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
नाल्याच्या सुरुवातीलाच असलेले बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचा आदेश देत खंडपीठाने महापालिकेला १९ आॅगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
कपूर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार, नगरसेवकाने केलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे नाला स्वच्छ करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
‘महापालिकेने पुढील सुनावणीपर्यंत बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी आणि पुढील सुनावणीपर्यंत यासंबंधी अहवाल सादर करावा,’ असे निर्देश खंडपीठाने महापालिकेला दिले. (प्रतिनिधी)