देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारची परवानगी घेतली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:06 AM2021-01-23T04:06:53+5:302021-01-23T04:06:53+5:30
दंडाधिकाऱ्यांनी केली तक्रारदाराकडे विचारणा देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारची परवानगी घेतली का? कंगना रनाैत प्रकरण : दंडाधिकाऱ्यांनी केली तक्रारदाराकडे विचारणा ...
दंडाधिकाऱ्यांनी केली तक्रारदाराकडे विचारणा
देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारची परवानगी घेतली का?
कंगना रनाैत प्रकरण : दंडाधिकाऱ्यांनी केली तक्रारदाराकडे विचारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतली का, असा सवाल न्यायदंडाधिकारी यांनी तक्रारदार अली खाशिफ खान देशमुख यांना शुक्रवारी केला.
सीआरपीसी कलम १९६ नुसार देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्ह्याची दखल घेण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी मी अर्ज करणार आहे, असे खान यांनी सांगितले. आता या अर्जावरील सुनावणी १० मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.
सोशल मीडियाद्वारे कंगना व तिची बहीण देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत व्यवसायाने वकील असलेले अली खाशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायालयात कंगना व तिच्या बहिणीविरोधात खासगी तक्रार केली आहे.