Join us  

तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादीशी गद्दारी केली का? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 4:39 PM

रविवारी राष्ट्रावादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

रविवारी राष्ट्रावादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे, या शपथविधी सोहळ्याला शरद पवार यांचे जवळचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे. आता पटेल यांनी शरद पवार यांचा विश्वासघात केल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आज पटेल यांनी प्रतिक्रीया दिली.  

Video: फुलांची उधळण, शरद पवारांना हस्तांदोलन; कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून प्रतिभाताई भावूक

पटेल रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते, जिथे अजित पवार आणि इतर आठ राष्ट्रवादी नेते महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले.

दुसऱ्या दिवशी सत्तावाटपाच्या बैठकीसाठी पटेल अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पटेल म्हणाले, "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि त्यामुळेच आम्ही हे करत आहोत." तुम्हाला मंत्रीपद मिळू शकेल का? त्यावर उत्तर देताना पटेल म्हणाले, 'आम्ही दिल्लीबाबत काहीही चर्चा केलेली नाही, आम्ही फक्त महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आहे.'

यावेळी पत्रकारांनी त्यांनी विचारले की, त्यांनी 'पक्षाचा आणि शरद पवारांचा विश्वासघात केला आहे का?' यावेळी पटेल यांनी रागाच्या भरात कारची खिडकी बंद केली आणि ते निघून गेले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते आहे. 

रविवारच्या शपथविधी सोहळ्याला प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीने अजित पवारांच्या बंडाला मोठा पाठिंबा असल्याचे सूचित केले. एकनाश शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारप्रफुल्ल पटेल