रश्मी आणि तेजस ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली का? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:06 PM2023-05-05T17:06:36+5:302023-05-05T17:15:36+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची बातमी समोर आली होती.

Did Rashmi and Tejas Thackeray meet Chief Minister Eknath Shinde? Shrikant Shinde said... | रश्मी आणि तेजस ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली का? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

रश्मी आणि तेजस ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली का? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई- दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

“… काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले,” कर्नाटकात मोदींचा ‘द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांना मा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केले आहे. हे वृत्त निराधार आणि धादांत खोटं असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांची अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही, लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे,  असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: Did Rashmi and Tejas Thackeray meet Chief Minister Eknath Shinde? Shrikant Shinde said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.