सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:06 AM2021-01-22T04:06:50+5:302021-01-22T04:06:50+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी केली चौकशीची मागणी सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली? प्रकाश आंबेडकर यांनी केली चौकशीची मागणी लोकमत ...
प्रकाश आंबेडकर यांनी केली चौकशीची मागणी
सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली?
प्रकाश आंबेडकर यांनी केली चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग लागली की लावण्यात आली, याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दिल्लीतील शाहिन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीबाबत शंका उपस्थित केली. याचा तपास राज्य सरकारने करावा, असे ते म्हणाले.
दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी ते आंदोलन करीत आहेत. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच अन्य मागण्यांसाठी शाहिन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. २७ जानेवारी रोजी हे आंदोलन राज्यभर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
................................................