Join us

पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हे केलं की काय?; शिवसेनेनं व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 10:04 AM

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच फेरबदल करण्यात आला आहे.

मुंबई: भाजपाचे नेते डॉ. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय?. असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं शंका व्यक्त केली आहे.

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच फेरबदल करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळातील या फेरबदलावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच फेरबदल करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळातील या फेरबदलावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल, असं सामन्यात म्हटलं आहे. 

भाजपाच्या नेत्या डॉ. भारती पवार व नेते कपिल पाटील हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे,' असा टोमणाही शिवसेनेने लगावला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्तारा आधी केंद्र सरकारने एक सहकार खाते निर्माण केले. सहकार हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय पण आता केंद्र त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरु नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळं करणार काय?,' असा सवालही यावेळी शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकार