तुमच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतलंय का?; मग थेट कंपनीला फोन करा, महावितरणचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:16 PM2022-02-07T16:16:32+5:302022-02-07T16:20:02+5:30

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या मीटर रीडिंगसह इतर अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त आहेत.

Did you get your meter reading wrong ?; Then call the company directly, MSEDCL | तुमच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतलंय का?; मग थेट कंपनीला फोन करा, महावितरणचे स्पष्टीकरण

तुमच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतलंय का?; मग थेट कंपनीला फोन करा, महावितरणचे स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई : आपल्या वीज बिलात वाढ झाली आहे. आपल्या विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतले आहे, अशी थोडी तरी शंका आपल्याला आली तर आता थेट वीज कंपनीला फोन करण्याची मुभा वीज ग्राहकांना आहे. कारण वीज ग्राहकांनी आपल्या विजेच्या मीटरच्या रीडिंगबाबत तक्रार केली, तर एजन्सीचा माणूस न येता थेट कंपनीचा माणूस आपल्या दारात उभा राहून आपली तक्रार सोडविणार आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या मीटर रीडिंगसह इतर अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त आहेत. मुळात महावितरण विजेच्या मीटरचे रीडिंग घेत नाही. यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. समजा एजन्सीच्या माणसाने विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतले. वीज ग्राहकाने याबाबत तक्रार केली तर यातच खूप वेळ जातो. वीज बिल वसूल होतानाच अडचणी येतात.

तक्रार दाखल झाल्यानंतर ती सोडविण्यासाठी एजन्सीच्या माणसाऐवजी महावितरणचा माणूस पाठवावा लागतो. हे सगळे करताना वीज बिल वसूल होण्यास विलंब होतो. थकबाकी वाढत जाते. या कारणात्सव विजेच्या मीटर रीडिंगबाबत वीज ग्राहकांना काही अडचण असल्यास त्यांनी तक्रार करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक सेवेचा वापर करावा. विजेची थकबाकी कमी करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्ह्यातील घरगुती ग्राहक

टाटा - ६७९७४०

अदानी - २०२७६५१

बेस्ट - ७५२७९२

महावितरण - ६८५७७८

घरगुती निवासी

विजेचा दर (रुपये प्रति युनिट)

ग्राहक गट/महावितरण/बेस्ट/अदानी/टाटा

० ते १०० युनिट/६.०३/३.५४/४.८७/२.१६

१०१ ते ३०० युनिट /९.९४/६.४९/७.२९/५.२४

३०१ ते ५०० युनिट /१२.८४/८.९८/८.८७/८.७८

५०० पेक्षा अधिक युनिट /१३.५४/१०.३९/१०.०१/९.८१

आता खपवून घेतले जाणार नाही

फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत आहेत. मात्र, आता काहीच खपवून घेतले जाणार नाही, असे महावितरणने म्हटले आहे.

काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय

ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग शंभर टक्के अचूकतेने घेतले पाहिजे. यामध्ये हयगय केल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केवळ एक नोटीस पाठवून रीडिंग एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात १०० टक्के अचूक मीटर रीडिंग घेण्यात अपयशी ठरलेल्या सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

- विजय सिंघल, अध्यक्ष महावितरण

Web Title: Did you get your meter reading wrong ?; Then call the company directly, MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.