Join us

जयंत पाटलांना ऑफर दिली का? भाजप प्रवक्त्याने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 1:32 PM

सामनाच्या अग्रलेखामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई- सामनाच्या अग्रलेखामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ईडीने त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने शिवसेनेचे ४० आमदार पळून गेल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. त्यांच्यापैकी काहींना तपासासाठी समन्स आणि अटक वॉरंट होते. त्यांनी बाजू बदलताच भाजपने त्यांना ईडीकडून संरक्षण दिले, पण छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत हे नेते ईडीच्या कारवाईला बळी पडले नाहीत. जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर ईडीने त्यांना तातडीने समन्स बजावले, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये येण्याचा दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. जयंत पाटील यांनी भाजपची ऑफर फेटाळल्यानंतर ईडीने त्यांना तातडीने समन्स बजावले आणि साडे नऊ तास चौकशी केली, असंही म्हटले आहे. यावरुन आता आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. 

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उपाध्ये यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. केशव उपाध्ये यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.  भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची ही संजय राऊतांची आजची अवस्था आहे, असा टोला उपाध्ये यांनी संजय राऊत यांना लगावला. 'हा त्यांचा फॉर्म्युला आहे, सामना फेक न्यूज फॅक्टरी झाली आहे. जयंत पाटील यांना प्रस्ताव देण्याचा भाजपचा प्रश्नच येत नाही. जयंत पाटील यांना ऑफर देण्याचा आरोप उपाध्ये यांनी चुकीचे असल्याचे सांगितले. 

...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर

वानखेडे प्रकरणी चौकशीची मागणी

ईडीने अनेक लोकांवर ही कारवाई केली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की नवाब मलिक यांच्यावरील गुन्हेही खोटे ठरतील. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुराव्यानिशी भ्रष्टाचार, खंडणी, दहशतवाद आदी आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला 'कॉर्डेलिया' क्रूझ प्रकरणात 'ड्रग्ज' बाळगल्याप्रकरणी अटक. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीही अशीच गोवण्यात आली होती. अशा प्रकारे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. वानखेडेचे न्यायालय आणि प्रकरण आता उघड झाले आहे. वानखेडे प्रकरणात अनेक भाजप नेत्यांचे हात डागले असून त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटले आहे. 

टॅग्स :जयंत पाटीलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊतशिवसेना