मुंबई : दिवाळी तोंडावर असताना सोने-चांदीचे दर वर-खाली होत आहेत. विशेषत: आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. आता सोन्याचे भाव प्रतितोळा ६० हजार रुपये असून, दिवाळीत कदाचित हा भाव प्रतितोळा ६५ हजार होईल, अशी शक्यता सराफांनी वर्तविली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवातच सोने खरेदीसाठी दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे.
झवेरी बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी आता दाखल होणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. लग्नसराईपासून विविध कार्यक्रमांसाठी ही खरेदी केली जात आहे. आता सोन्याचा भाव ६० हजार आहे. दिवाळीत हा भाव ६५ हजार होईल, असे ग्राहकांना वाटत असल्याने आता सोन्याची खरेदी करण्यावर जोर दिला जात आहे.- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन