प्रफुल्ल पटेल यांच्याशी रोज बोलणं होतं का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:43 PM2023-10-08T13:43:01+5:302023-10-08T13:48:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसापूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत रोज बोलणं होतं असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अतिशय विनम्र पणे सांगते याअगोदर चार महिन्यापूर्वी मी रोज बोलायचे, पण फूट पडल्यानंतर मी रोज बोलत नाही. वाटतं असेल तर त्यांनी आमचे फोन टॅप करावे लक्षात येईल. व्हॉट्सअॅपही त्यांनी तपासावे, मी त्यांना मेसेज केला आहे की त्यांनी पाठवला आहे हे तपासा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुळे म्हणाल्या, प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत शरद पवार यांनी दडपशाही केली. ती राज्यसभेच्या निवडणुकीवेळी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी पटेल यांना विरोध केला. त्यावेळी शरद पवार यांनी दडपशाही केली आणि प्रफुल्ल पटेलच आपले उमेदवार असतील असं सांगितलं, असंही सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीनंतर आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे.
आयोगाच्या तिन्ही आयुक्तांपुढे दुपारी चार वाजता शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी, तर अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली.