मरण झाले स्वस्त; राज्यात पाच महिन्यात रस्ते अपघातात साडेपाच हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:38+5:302021-06-29T04:06:38+5:30

मुंबई : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणासही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यावर अपघातांतही ...

Died cheap; Five and a half thousand deaths in road accidents in the state in five months | मरण झाले स्वस्त; राज्यात पाच महिन्यात रस्ते अपघातात साडेपाच हजार मृत्यू

मरण झाले स्वस्त; राज्यात पाच महिन्यात रस्ते अपघातात साडेपाच हजार मृत्यू

Next

मुंबई : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणासही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यावर अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढवला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले. संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत ५२५० रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये ५६६०व्यक्तींनी या अपघातात आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे जानेवारी ते मे २०२० या कालावधीत ३९६७ व्यक्तींनी जीव गमावला होता. अतिवेगाने वाहन चालविणे,धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे या कारणांमुळे अपघात घडले आहेत. सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर न करणे, नियमांचा भंग करणे यामुळेही अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काहीकाळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षात रस्ते अपघातांत १७२२९ जणांचा बळी गेला आहे.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. यात नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साइडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही चूक तरुणाई करीत असल्याचे दिसते.

अपघातानंतर दिनचर्या बदलून गेली आहे. जीवन अमूल्य आहे, याची कल्पना मला आली आहे. आपल्यासोबत इतरांचेही आयुष्य आपण धोक्यात घालत असतो. त्यामुळे वाहन चालवताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

- निखिल सुपे, वाहनचालक

वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दोन सेकंदांसाठी माझा जीव वाचला, नाहीतर मी आज या जगात नसतो. नशीब बलवत्तर होते म्हणूनच मी बचावलो. म्हणूनच नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. जेणे करुन अपघात टाळता येईल.

- अनिकेत मुळे,वाहनचालक

कालावधी - अपघात - मृत्यू

२०१८ - ३५७१७-१३२६१

२०१९ - ३२९२५- १२७८८

२०२०- २४९७१-११५६९

जानेवारी ते मे २१- १२०३०- ५६६०

Web Title: Died cheap; Five and a half thousand deaths in road accidents in the state in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.