डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; पेट्रोलपेक्षा अधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:00 AM2020-06-28T04:00:17+5:302020-06-28T04:00:29+5:30

मागील वीस दिवसात एका लीटरमागे ४.३८ रु पयांची वाढ

Diesel price hike hits ST; Rates higher than petrol | डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; पेट्रोलपेक्षा अधिक दर

डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; पेट्रोलपेक्षा अधिक दर

Next

मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम एसटीवर होत आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे तोट्यातील एसटीचे चाक आणखी खोलात जात आहे. १ जून रोजी एक लीटर डिझेल ६४.४७ रुपयांना होते. मात्र आता यासाठी ६८.८५ रुपये एसटीला मोजावे लागत आहेत. त्यामुळे एका लीटरमागे एसटीला ४.३८ रुपयांची झळ सोसावी लागत आहे.

महामंडळाला नियमित एसटीच्या वाहतुकीसाठी दैनंदिन १२ लाख लीटर डिझेल लागले. यामध्ये सुमारे १८ हजार एसटी फेऱ्या रस्त्यांवर धावतात. त्यातून महामंडळाला दैनंदिन २२ कोटींचे उत्पन्नसुद्धा मिळते. मात्र, सध्या एसटीची प्रवासी सुविधा संपूर्ण बंद आहे. फक्त मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, राज्यामध्ये आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू आहे. महामंडळाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वर्षाला ३ हजार कोटींची फक्त डिझेल खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात दरवर्षी सुमारे २ हजार ८०० कोटींचा डिझेलवर खर्च होत असल्याने, उत्पन्नाच्या तुलनेत जास्तीत जास्त खर्च डिझेलवर होताना दिसून येत आहे. त्यामध्ये आता लॉकडाऊनमुळे एसटीची सेवा बंद असताना, डिझेल दरवाढ झाली असतानाही एसटीला महागाचे डिझेल विकत घेऊन अत्यावश्यक सुविधा द्यावीच लागत आहे. त्यामुळे भविष्यात एसटीची वाट मात्र खराब होण्याची शक्यता दिसून येत आहे.

मुंबई, पालघर, ठाणे या विभागांतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी धावत आहेत. यासाठी २ हजार २००हून अधिक फेºया धावत आहेत. मात्र एका फेरीला अंदाजे १२.५० लीटर डिझेल लागते. तर, संपूर्ण फेºयांसाठी २७ हजार ५०० लीटर डिझेल लागत आहे. यासाठी एसटीला सुमारे १९ लाख रुपये खर्च होत आहे. मात्र एसटीला या फेºयांमधून सुमारे १९ लाख रुपयांचे उत्पन्न होत असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. त्यामुळे एसटीला कोणत्याही प्रकारचा नफा मिळताना दिसून येत नाही.

मे महिन्याच्या तुलनेत १३.३ रु पये अधिक मोजावे लागत आहेत
लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या एसटीला आता डिझेल दरवाढीचा चांगलाच फटका बसताना दिसून येत आहे. लॉकÞडाऊन काळात दरदिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ होत आहे. एसटी महामंडळाला २१ मे रोजी ५५.११ रुपयांमध्ये डिझेल विकत मिळत होते. तर, १ जून रोजी ६४.४७ रुपयाने विकत घ्यावे लागले. तर, आता यासाठी ६८.८५ रु पये मोजावे लागत आहेत. त्यामुळे १३.३ रुपयांची वाढ सोसावी लागत आहे.

राज्यभरात एसटीची सेवा काही प्रमाणात सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी एसटीचा मुख्य प्रवासीवर्ग आहे. मात्र लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी नाहीत. तर, ज्येष्ठ नागरिक प्रवास करण्यास बाहेर पडत नाहीत. त्यामुळे एसटीची सेवा कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे डिझेल खर्च आणि प्रवासी उत्पन्न यांचा मेळ सध्या बसत नसल्याचे दिसून येत आहे.

डिझेलवर एसटीचा वर्षाला ३ हजार कोटी खर्च होतो. केंद्र सरकारचा अबकारी कर व राज्य सरकारचा डिझेलवर मूल्यवर्धित कर हटवले पाहिजेत. तर, वर्षाला १ हजार २०० कोटींची बचत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

Web Title: Diesel price hike hits ST; Rates higher than petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.