मुंबई : आॅक्टोबर हीटने मुंबईकरांचा घाम काढला असतानाच आता मुंबईच्या तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या नोंदीनुसार सांताक्रुझ वेधशाळा येथे किमान तापमान २० अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामान खात्याच्या नोंदीनुसार कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात आला आहे. सकाळच्या हवेत गारवा निर्माण झाला असून, सायंकाळचे वातावरण मात्र काहीसे गरम असल्याचे हवामान खात्याने नोंदविले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात तसेच विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.२५ आॅक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२६ ते २८ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२५ आॅक्टोबर : मुंबई आणि परिसरात आकाश निरभ्र राहील.२६ आॅक्टोबर : मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील.>तापमानाची नोंदठिकाण किमानकांदिवली (पू.) २२.४०चारकोप २२.५७कांदिवली (प.) २१.६४गोरेगाव १६.६०आकुर्ली १९.८३वांद्रे (प.) २२.६०मुलुंड (पू.) २१.२५वरळी १६.५४घाटकोपर २४.३०मुलुंड (प.) १९.९०जोगेश्वरी २२.२२दादर २३.५०पनवेल १६.९०सांताक्रुझ २३.६५विद्याविहार २३.५८पवई १९.०९चेंबूर २०.३८भांडुप (प.) १५.७६वांद्रे (पू.) २१.९६अंधेरी (पू.) २३.२५मालाड (प.) २३माझगाव २३.३३बोरीवली (प.) १९.०९नेरूळ २०.०५
मुंबई २० अंशावर, कमाल आणि किमान तापमानात १५ अंशाचा फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:53 AM