मुंबई : मंगळवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान अमरावती येथे १०.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, ८ आणि ९ जानेवारी रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येईल; तसेच उत्तर महाराष्ट्राच्या तापमानातही घट नोंदविण्यात येईल, असा अंदाज वर्तवितानाच ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले असून, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत किमान तापमानात दोन अंशांची वाढ झाली आहे. विशेषत: दिवसा आणि रात्रीच्या तुलनेत १२ ते १५ अंशांचा फरक नोंदविण्यात येत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. परिणामी दिवसा ऊन तर रात्री गारवा असे दुहेरी वातावरण मुंबईत पाहण्यास मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात किंचित वेळा मुंबईत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे.>राज्यासाठी अंदाज८ जानेवारी : विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.९ जानेवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.१० आणि ११ जानेवारी : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १८ अंशाच्या आसपास राहील.>राज्यातील शहरांचे किमान तापमानसांताक्रूझ १९.६पुणे १४.४अहमदनगर १४.५जळगाव १५महाबळेश्वर १४.६मालेगाव १४.४नाशिक १४सांगली १८.३सातारा १६.६सोलापूर १८.८उस्मानाबाद १३औरंगाबाद १३.७परभणी १५नांदेड १३बीड १६.३अकोला १४.१अमरावती १०.१ब्रहमपुरी १२चंद्रपूर १४.८गोंदिया १०.२नागपूर ११.५वाशिम १३वर्धा १४.६(अंश सेल्सिअस)
मुंबईच्या दिवसा आणि रात्रीच्या तापमानात १२ ते १५ अंशांचा फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:44 AM