करिअरच्या वेगळ्या वाटा

By Admin | Published: June 19, 2014 12:46 AM2014-06-19T00:46:45+5:302014-06-19T00:46:45+5:30

पहिल्यांदा टी.व्ही वर मला रिपोर्टिंग करताना पाहून माज्या आई- बाबांना भरुन आलं. अगदी गावावरुन अभिनंदनाचे फोन आले. काही दिवसांनी माझा मित्र म्हणाला, किती दिवस आपण नोकरी करायची?

Different career career | करिअरच्या वेगळ्या वाटा

करिअरच्या वेगळ्या वाटा

googlenewsNext


मुंबई: जीवनात काही वेगळे करून दाखवण्याची जिद्द असणे आणि त्याप्रमाणे मार्ग करून दाखवणे धैर्याचेच आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड सर्वांना प्रेरणा देणाऱ्या ठरतात. अशाच या काही महिला ज्यांनी लहान वयातच करिअरच्या वेगळ्या वाटा निवडत स्वत:चे नाव उंचावले आहे.

मिडीयात वेगळं करायचं होतं
व्यवसाय कुठला करावा? बरं व्यवसायात आपण तग धरून राहु की नाही असे विविध प्रश्न मनात होते. व्यवसाय क्षेत्रात येण्याआधी मी एकांकिका, सिनेमांतून कामे केली आहेत. सुरूवातीपासून कलाक्षेत्राशी नातं असल्यामुळे मिडिया क्षेत्रातच काही वेगळं करायचं आहे म्हणून अनुभवासाठी पाईनअ‍ॅप्पल मिडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स या कंपनीसोबत काम करत असतानाच सहा महिन्याचा अनुभव घेऊन या कामासोबतच मी स्वत:ची कंपनी ‘नीव मिडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स’ची सुरूवात केली. माझ्या कंपनीद्वारे मी आज सर्व प्रकारची फोटोग्राफी, शॉर्टफिल्म, कॉपोर्रेट एव्ही, एडिटिंगची दजेर्दार कामं करते. माझ्या कंपनीची निर्मिती असलेली एका महिलेच्या सक्सेस स्टोरीवर आधारित असलेली शॉर्ट फिल्म ‘फ्लेम इन दि डार्क’ नुकतीच ‘एम्स इंटरनॅशनल’ या फेस्टिवलसाठी पाठविण्यात आली आहे.- दर्शना धनवडे, विक्रोळी

एकविसाव्या वर्षी संस्थापिका झाले

‘पत्रकारीतेमध्ये मास्टर्स करत होते. सगळे मित्र कुठे ना कुठे इंटर्नशिप करत होते. मी सुद्धा आयबीएन लोकमत मध्ये इंटर्नशिप केली. लहानपणापासून टी.व्ही वरच्या बातम्या पाहताना आई नेहमी म्हणे, तु कधी टी.व्ही वर दिसणार? पण तिचा हा प्रश्नच नकळत मला या क्षेत्रात घेऊन गेला. पहिल्यांदा टी.व्ही वर मला रिपोर्टिंग करताना पाहून माज्या आई- बाबांना भरुन आलं. अगदी गावावरुन अभिनंदनाचे फोन आले. काही दिवसांनी माझा मित्र म्हणाला, किती दिवस आपण नोकरी करायची? त्यापेक्षा आपण आपला बिझनेस सुरु करुया. आणि आम्ही पाच मित्रांनी एकत्र येऊन २५ जून २०१० मध्ये ‘युक्ती मीडिया कन्सल्टन्सी’ नावाची जनसंपर्क क्षेत्रातील कंपनी सुरु केली. वयाच्या २१ व्या वर्षी युक्ती मीडिया सह-संस्थापिका झाले. सेवा क्षेत्रात असल्याने क्लायंटचं समाधान हेच आमचं उद्दीष्ट असतं. विश्वसनीय व दजेर्दार सेवा आणि दृढ नातेसंबंध टिकविल्याने आज आमच्याकडे क्लायंट्स पुन: पुन्हा येत आहेत. कमीत कमी मोबदल्यात उत्तम सेवा क्लायंटला हवी असते. परंतु दर्जा हवा असेल तर त्याचा मोबदला देखील तेव्हढाच असतो हे मात्र त्यांना मान्य नसतं नेमकी हीच समस्या या क्षेत्रासमोर आहे. पण आम्ही ‘क्लायंट इज आॅलवेज राईट’ या सूत्राने त्यांना सेवा देतो. मात्र हे करीत असताना तत्वांशी तडजोड करीत नाही. २०२० पर्यंत माध्यम क्षेत्रातील एक नावाजलेली आणि गुणी कंपनी बणविण्याचं उद्दीष्ट आमच्यासमोर आहे. मी पहिल्या पिढीतील उद्योजिका आहे. उद्योजिका बनताना किती समस्यांना तोंड द्यावे लागते हे माहित असल्यानेच किमान २ मुलींना तरी महिला उद्योजिका म्हणून उभं राहण्यास मदत करण्याचं माझं स्वप्न आहे.’- अर्चना सोंडे, मुलुंड
 

Web Title: Different career career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.