Join us

मलजल प्रक्रिया प्रकल्पात अडचणी

By admin | Published: March 27, 2016 1:35 AM

पालिकेच्या महत्त्वाकांक्षी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार झाला खरा, मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नवीन मानके अत्यंत कठोर व बंधनकारक असल्याने सातपैकी

- शेफाली परब-पंडित,  मुंबईपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार झाला खरा, मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नवीन मानके अत्यंत कठोर व बंधनकारक असल्याने सातपैकी सहा प्रकल्पांसाठी नवीन सल्लागार नेमण्याची वेळ पालिकेवर आली. त्यामुळे मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.भांडुप, घाटकोपर, कुलाबा, वर्सोवा, मालाड आणि वरळी अशा सहा ठिकाणी मलजल पुन:प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प पालिकेने काही वर्षांपूर्वी हाती घेतला; मात्र यापैकी प्रत्येक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा खर्च शेकडो कोटींच्या घरात असल्यामुळे यासाठी केंद्रातून मदत मिळवण्यात आली़ त्यानुसार जेएनएनआरयूएम अंतर्गत पालिकेला केंद्र आणि राज्य शासनामार्फत ५० टक्के निधी मिळणार होता़ परंतु केंद्रात सरकार बदलताच जेएनएनआरयूएम या योजनेमध्ये सुधारणा सुरू झाली़ त्यामुळे हा प्रकल्प स्वबळावरच उभा करण्याची वेळ पालिकेवर आली. त्याचबरोबर विविध परवानग्या व ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची आव्हाने अद्यापही कायम आहेत. यामध्ये प्रकल्पासाठी जागा, वन व पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र आदी आव्हाने पार करूनच या प्रकल्पाचा श्रीगणेशा करणे पालिकेला शक्य होणार आहे.केंद्रात सरकार बदलताच जेएनएनआरयूएम या योजनेमध्ये सुधारणा सुरू झाली़ यामुळे हा प्रकल्प स्वबळावरच उभा करण्याची वेळ पालिकेवर आली. महापालिकेला नोटीसहा प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला नोटीस पाठविली आहे. मुंबई मलनिस्सारण प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत सध्या अस्तित्वात असलेले प्रक्रिया केंद्र शहरातील मलजल वाहिन्यांशी जोडण्यात येणार आहेत़ या अंतर्गत भांडुप मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्यात येणार आहे़ यासाठी ३६५ कोटी खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला आहे़ त्याचबरोबर अन्य ७ मलनिस्सारण प्रकल्पांचाही अहवाल तयार होत आहे़या प्रकल्पांना हवा निधीवांद्रे येथे जय भारत मलजल बोगदा (३८ कोटी), वर्सोवा अंतर्गामी उदंचन केंद्र (२३७ कोटी), वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्र (३७१ कोटी), मालाड अंतर्गामी उदंचन केंद्र (३२८ कोटी), वर्सोवा आणि मालाड बहिर्गामी उदंचन केंद्रातून पातमुखाकडे जाणारा मुख्य मलजल बोगदा (१६८ कोटी) मालाड येथील प्राधान्य मलनिस्सारण बोगदा टप्पा १ (३६८ कोटी) आणि टप्पा २ (१७० कोटी). या परवानगीची प्रतीक्षाजमीन, सीआरझेडच्या नियमांची पूर्तता, उच्च न्यायालयाची परवानगी, कांदळवन आणि वन व पर्यावरण खात्याची परवानगी, वेळोवेळी केंद्रिय पर्यावरण नियामक मंडळाची बदलणारी मानकेप्रकल्पांची प्रगती पुढीलप्रकारे- केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाची २०१५पासून बदलेली मानके अत्यंत कठोर व बंधनकारक असल्याने सातपैकी सहा मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी नवीन सल्लागार नेमण्यात आले आहेत. - कुलाबा मलनिस्सारण केंद्रासाठी मागविलेल्या निविदांची छाननी सुरू आहे. - भांडुप व घाटकोपर येथील मलनिस्सारण केंद्रांच्या कामांसाठी मसुदा निविदा तयार झाल्या आहेत. - वरळी व वांद्रे येथे जागेची कमतरता आहे. सल्लागाराची नेमणूक करून त्यांना नवीन मानकांप्रमाणे, योग्य वाटल्यास बहुमजली मलजल प्रक्रिया केंद्र तयार करण्याविषयीची शक्यता व व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू आहे. - वर्सोवा येथील कामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. - मालाड प्रक्रिया केंद्रासाठी सागरी नियंत्रण क्षेत्र व वन व पर्यावरण खात्यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित आहे. या केंद्रासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.