Join us

दिघावासीयांची राज ठाकरेंकडे धाव

By admin | Published: October 16, 2015 2:28 AM

भूमाफियांचा बळी ठरलेल्या दिघावासीयांनी आपली घरे वाचवण्यासाठी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कॅम्पाकोलाप्रमाणेच दिघ्याच्या घरांवर कारवाईला स्थगिती मिळावी

नवी मुंबई : भूमाफियांचा बळी ठरलेल्या दिघावासीयांनी आपली घरे वाचवण्यासाठी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कॅम्पाकोलाप्रमाणेच दिघ्याच्या घरांवर कारवाईला स्थगिती मिळावी, अशी मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. दिघा परिसरातील रहिवाशांनी घर वाचविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी कॅम्पाकोला प्रकरणात रहिवाशांची भूमिका सरकारपुढे मांडली होती. अशाच प्रकारे त्यांनी दिघावासीयांची बाजू सरकारपुढे मांडावी, अशी मागणी रहिवाशांनी ठाकरे यांच्याकडे केली. घरांवर होणारी कारवाई टाळण्यासाठी सरकारमार्फत न्यायालयापुढे भूमिका मांडणे आवश्यक आहे. तसे झाले तरच उर्वरित इमारतींवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीला न्यायालयात जाणे शक्य नसल्याने त्यांची एकत्रित भूमिका सरकारपुढे मांडणे गरजेचे आहे. त्यानुसार रहिवाशांची घरे वाचविण्यासाठी ठाकरे यांची भेट घेतल्याचे नगरसेविका अपर्णा गवते यांनी सांगितले. सध्या दिघा येथील रहिवाशांची घरे वाचणे आवश्यक असल्याने त्यांच्याकडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. त्यानुसार राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचेही गवते यांनी सांगितले.(प्रतिनिधी)