महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहात तिकीटे काढण्यासाठी डिजिटल पर्याय होणार उपलब्ध
By मनोहर कुंभेजकर | Published: February 28, 2024 02:52 PM2024-02-28T14:52:08+5:302024-02-28T14:52:21+5:30
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पत्राची दखल
मुंबई-महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहावर मिळणाऱ्या तिकिटासाठी कॅशचाच (रोखीने व्यवहार करण्यासाठी) सक्ती केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश सगळीकडे डिजिटल प्रणाली विकसित केली असूनही आजही महाराष्ट्रात नाट्यगृहावर आपल्याला रोख रक्कम देऊनच तिकिट खरेदी करावी लागते. रस्त्यावर बसणारे फेरीवाले देखील डिजिटल पद्धतीने व्यवहार करतांना दिसतात. नाट्यगृहात तिकीटे विक्री साठी क्रेडिट कार्ड,जी पे,फोन पे सारख्या प्रणालींचा वापर थिएटरवरही होणे आवश्यक व गरजेचे आहे.
यासाठी भाजपा बोरीवली विधानसभा उपाध्यक्ष सुधीर परांजपे यांनी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना या संदर्भात पत्र दिले होते. खासदार शेट्टी यांनी राज्याचे संस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे तशी मागणी करणारे पत्र दिले आहे.या संदर्भात चौकशी करून निर्णय घ्यावा असे निर्देश त्यांनी अवर सचिव नगरविकास विभाग यांना दिले आहेत.या नंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहात देखील तिकीटे काढण्यासाठी रोखी बरोबरच डिजिटल पर्याय उपलब्ध होतील अशा विश्वास सुधीर परांजपे यांनी व्यक्त केला.