Join us

वीज ग्राहकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 6:31 PM

Digital platforms for consumers : : पहिले व्हिडिओ काँटॅक्ट सेंटर

ठळक मुद्दे९० स्वयंसहाय्यता किऑस्क यंत्रांची स्थापना  स्मार्ट मीटर्सचे नियोजन

मुंबई : कोविड-१९ साथीने जगाला अधिक घट्ट जोडले आहे आणि ग्राहकांच्या सर्व वर्गांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर खूपच वाढला आहे. अधिकाधिक ग्राहक तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ लागले असताना, युटिलिटीजसाठी संधीही अनंत आहेत. शंकांचे निरसन व्हर्च्युअल पद्धतीने करून घेण्यातील सोय आणि यूजर फ्रेण्डली इंटरफेसेसची जोड मिळालेले वन-क्लिक पेमेंट्स यांमुळे प्रत्यक्ष भेट देणे किंवा पैसे भरण्याच्या अन्य मार्गांना अत्यंत आकर्षक पर्याय उपलब्ध झाला आहे. सेल्फ मीटर रीडिंग, ईमेल व एसएमएसद्वारे बिले प्राप्त करणे, वेबसाइटवर किंवा अॅपवर बिले बघणे यांसारख्या अनेकविध सेवा डिजिटल पर्यायांचा वापर करून उपलब्ध करून घेऊ लागले आहेत. ग्राहक त्यांची बिले ऑनलाइन मार्गांनी चुकती करू शकतात, नवीन जोडणीसाठी अर्ज करू शकतात, बिलावरील नावे बदलून घेण्यासारख्या प्रक्रिया ऑनलाइन करू शकतात तसेच अशा अनेक सेवांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकतात. ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने आपल्या वेबसाइट तसेच अॅपवर डिजिटल फीचर्सचा ताफा आणला आहे. ग्राहकांना एका क्लिकद्वारे तसेच आपापल्या घरांत बसून आरामात व्हर्च्युअल पद्धतीने या सेवांचा लाभ घेता यावा हे निश्चित करण्यासाठी हे फीचर्स विकसित करण्यात आले आहेत. सर्व विभागांमध्ये आभासी (व्हर्च्युअल) संपर्क केंद्रे स्थापन केली, जेणेकरून ग्राहकांना संपर्क करून अखंडितपणे त्यांच्या शंकांचे निरसन करू घेता येईल. मोबाइल किऑस्क ही व्यवस्था सुरू केली. यामध्ये ग्राहकांच्या बिल भरण्याच्या अंतिम तारखांनुसार विशिष्ट विभागांमध्ये हे मोबाइल किऑस्क सुरू करण्यात आले, जेणेकरून ग्राहकांना बिले भरण्यासाठी आमच्या कोणत्याही कंझ्युमर केअर सेंटरमध्ये जायला लागू नये. सर्व ५ विभागांमध्ये ९० स्वयंसहाय्यता किऑस्क मशिन्स बसवण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या सोयीने रोख/धनादेशाद्वारे किंवा डेबिट/क्रेडिट कार्डाद्वारे बिले भरता यावीत. ग्राहक सेल्फ हेल्प किऑस्कच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात, बिलाची डुप्लिकेट प्रत घेऊ शकतात, सुरक्षा अनामत रक्कम किंवा अन्य शुल्कही भरू शकतात.

एसएसएम/व्हॉट्सअॅप किंवा एईएमएल वेबसाइटवरील चॅटबोट एलेक्ट्रा यांसारख्या विविध माध्यमांतून आपली मीटर वाचने सादर करण्याची क्षमता दिली. त्याचबरोबर ग्राहक त्यांची बिले ऑनलाइन बघू शकत होते व हिशेबाची पद्धत समजून घेऊ शकत होते. ग्राहकांनी मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करून त्याद्वारे आपली बिले भरली, त्यामुळे बिल भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली. ग्राहकांना फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम अॅप आदी अॅग्रीगेटर्सच्या तसेच अन्य डिजिटल मार्गांच्या माध्यमातून बिले भरण्याचा पर्यायही आहे. ते या प्लॅटफॉर्म्सवरील अनेकविध प्रमोशनल योजनांचा लाभही वेळोवेळी घेऊ शकतात. ग्राहक डेबिट/क्रेडिट कार्डे, नेटबँकिंग, यूपीआय, ऑनलाइन व्हीडीएस, आरटीजीएस/एनईएफटी आदी माध्यमांतून बिले भरू शकतात. कस्टमर मोबाइल अॅप नवीन स्वरूपात लाँच केले. हे अॅप बिल भरण्यापासून ते नावबदलासाठी अर्ज करण्यापर्यंत अनेकविध सुविधा देऊ करते तसेच ग्राहक या अॅपद्वारे आपला पेमेंट तसेच वीजवापराचा इतिहास तपासू शकतात. 

ग्राहकांसाठी पहिलेवहिले व्हिडिओ काँटॅक्ट सेंटर सुरू होणार आहे. या फीचरमुळे ग्राहकांना सेवा, आपल्या घरात बसून व्हर्च्युअल पद्धतीने एजंटशी संपर्क साधून, उपलब्ध करून घेता येतील. ग्राहक त्यांच्या सोयीने आमच्या व्हिडिओ काँटॅक्ट सेंटर एग्झिक्युटिव्ह्जसोबत अपॉइंटमेंट्स निश्चित करू शकतील. ग्राहक मोबाइल अॅप, वेबसाइट तसेच चॅटबोट एलेक्ट्राच्या माध्यमातून कॉल सुरू करू शकतील. ग्राहकांना विभागीय कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावे लागणार नाही याची काळजी हे फीचर घेईल. हा वीजवितरण कंपनीद्वारे राबवला जाणारा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. 

 

टॅग्स :वीजमुंबई