छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:09 AM2021-08-18T04:09:22+5:302021-08-18T04:09:22+5:30

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर नवीन, नावीन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल ...

Digital Smart Clock Room launched at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम सुरू

Next

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर नवीन, नावीन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजनाअंतर्गत डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम (डिजिलॉकर्स) साठी कंत्राट दिले आहे. रविवारपासून शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू करण्यात आले आहे.

रेल्वेतील हा पहिलाच प्रकल्प आहे जो सुरक्षित लॉकर्स, डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅगचा वापर आणि ऑनलाइन पावती निर्मितीद्वारे सुधारित क्लॉकरूम सेवा प्रदान करण्यासह रेल्वेसाठी उत्पन्न मिळणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, या डिजी क्लॉकमुळे प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्याबाबत सुरक्षितता आणि सोयीची अधिक चांगली व्यवस्था होईल. परवानाधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉकर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (१५ ऑगस्टपासून कार्यान्वित), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर सुरू करणार आहे. सेवाशुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही, जे २४ तासांसाठी प्रतिबॅग रु. ३० आहे. प्रवासी सामानाच्या आकारानुसार लॉकर निवडू शकतात. ‘लॅडर २ राइज प्रायव्हेट लिमिटेड’ प्रवाशांना मदत करण्यासाठी २४ तास चालविणार आहे.

वापरकर्त्यास युनिक बारकोडसह पावती मिळेल जी बॅग पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरली जाईल. पूर्णपणे स्वयंचलित मशीनसाठी प्रवाशांच्या प्रवासाचा तपशील आणि आरपीएफकडून अनिवार्य स्कॅनिंग टॅग यासाठी आवश्यक असेल. पाच वर्षांच्या कालावधीत डिजिटल वैशिष्ट्यांसह या आधुनिक लॉकर्सच्या स्थापनेचा आणि संचालनाचा खर्च परवानाधारकाद्वारे पूर्णपणे केला जाईल. या स्थानकांवरील क्लॉकरूम ऑपरेशन्सदेखील आउटसोर्स करून रेल्वेला पाच वर्षांत ७९.६५ लाखांचा महसूल मिळणार आहे.

Web Title: Digital Smart Clock Room launched at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.