Join us

डिजिटल लोकल तिकिटाला ‘पावतीचे’ विघ्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:28 AM

क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाइप करूनही स्लिप येईना; व्यवस्था नसल्याने योजना रखडणार

मुंबई : उपनगरीय रेल्वे तिकीट क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून खरेदी करण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. रेल्वे स्थानकांतील एटीव्हीएममध्ये क्रेडिट-डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर, ‘स्लिप’ येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. याबाबत रेल्वे सूचना प्रणाली केंद्राकडून (क्रिस) प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयामार्फत रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे क्रेडिट-डेबिट कार्डवरून लोकल तिकिटांच्या योजनेचा दिवाळी मुहूर्त हुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.मुंबई उपनगरीय लोकलवरील मध्य-हार्बरसह पश्चिम रेल्वेच्या बहुतांश स्थानकात आॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशिन (एटीव्हीएम) कार्यरत आहे. या मशिनमध्ये क्रेडिट-डेबिट कार्ड स्वाइप मशिन कार्यान्वित करून, याची चाचणी एप्रिल महिन्यात रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने घेतली. चाचणीअंती के्रडिट-डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर प्रवाशांना नेमके किती पैसे खात्यातून कमी झाले, याची माहिती मिळण्यासाठी पावतीची व्यवस्था करण्याबाबतची सूचना क्रिसने या प्रस्तावात केली आहे. सध्या हा प्रस्ताव मुख्यालयाकडे असून लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.रेल्वे स्थानकांवर तिकिटांसाठी सध्या तिकीट खिडक्यांप्रमाणेच एटीव्हीएम, जेटीबीएस, मोबाइल तिकिटिंग अशी व्यवस्था आहे. एटीव्हीएमवरून मध्य रेल्वे मार्गावर रोज सुमारे अडीच लाख आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे दोन लाख तिकिटांची विक्री होते. प्रत्यक्षात रेल्वेच्या स्मार्ट कार्डपेक्षा नागरिकांकडे क्रेडिट-डेबिट कार्ड असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना अधिक होऊन तिकीट खिडक्यांवरील गर्दीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.विशिष्ट बदल करावे लागणारमोबाइल तिकिटिंग यंत्रणेतही काही अंशी प्रवाशांकडून ‘रिफंड’बाबत अडचणी येत आहेत. रिफंड प्रक्रियेत क्रिस, आयआरसीटीसी आणि संबंधित बँक अशा विविध यंत्रणांचा समावेश असल्याने, रिफंड मिळण्यास सुमारे १० ते १२ दिवस लागतात. अशा प्रकारे समस्या प्रवाशांना येऊ नये, यासाठी के्रडिट-डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर, पावती येण्यासाठी एटीव्हीएममध्ये विशिष्ट बदल करावे लागणार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. मात्र, तशी व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे