‘रंगभूमीचे डिजिटायझेशन करणार’

By admin | Published: November 18, 2016 04:15 AM2016-11-18T04:15:46+5:302016-11-18T04:15:46+5:30

मराठी रंगभूमीचे डिजिटायझेशन करण्याचा प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे भाष्य मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी

'Digitization of theater' | ‘रंगभूमीचे डिजिटायझेशन करणार’

‘रंगभूमीचे डिजिटायझेशन करणार’

Next


मुंबई : नाट्य व्यवसायाला आधुनिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही मराठी रंगभूमीचे डिजिटायझेशन करण्याचा प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे भाष्य मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी निर्माता संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना केले. तसेच, येत्या काळात नाट्य व्यवसायासाठी नवनवीन योजना राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
‘बुकिंग क्लार्क’ हासुद्धा रंगभूमीचा महत्त्वाचा घटक आहे. नाटकाला येणारा प्रेक्षक प्रथम त्यांच्याकडे येतो. त्यामुळे त्यांची चांगली सोय होण्याच्या दृष्टीने डिजिटल बुकिंग सेंटर आणि वातानुकूलित बुकिंग रूम निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले. राज्य नाट्य व्यावसायिक स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. निर्माता संघाचे सचिव संतोष काणेकर यांच्यासह दिनू पेडणेकर, श्रीकांत तटकरे, अनंत पणशीकर, उदय धुरत, लता नार्वेकर, संतोष कोचरेकर, मुक्ता बर्वे, अभिजीत साटम आदी नाट्य निर्माते या वेळी उपस्थित होते. ‘

Web Title: 'Digitization of theater'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.