Join us

जर्मन संशोधन मंत्र्यांच्या हस्ते भारतीय शास्त्रज्ञाचा गौरव!

By admin | Published: November 12, 2014 1:13 AM

भारतीय शास्त्रज्ञ फेमीना पंडारा यांना जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका यांच्या हस्ते बर्लिन येथे ‘हरित कौशल्य पुरस्कार 2क्14’ने गौरविण्यात आले.

 मुंबई : भारतीय शास्त्रज्ञ फेमीना पंडारा यांना जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका यांच्या हस्ते बर्लिन येथे ‘हरित कौशल्य पुरस्कार 2क्14’ने गौरविण्यात आले. ‘हरित कौशल्य 2क्14’ पुरस्कारांसाठी निवड झालेल्या केवळ 25 व्यक्तींमध्ये तिचा समावेश होता. शेतीतील एकक्लिष्ट समस्येचे ख:या शास्त्रीय आणि आंतर-शाखीय मार्गाने  निराकरण केल्याने पंडारा हिला सन्मानित करण्यात आले.

हरित कौशल्य पुरस्कार म्हणजे टिकाव संशोधन क्षेत्रतील तरुण संशोधकांसाठी एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे; शास्त्रीय सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण यातूनच जागतिक टिकाव ध्येय साध्य होऊ शकते. यातून विविध देशातील तरुण शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक भेटी होतात. यंदाच्या सर्व हरित कौशल्य विजेत्यांचे अभिनंदन करीत जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका  यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
हरित कौशल्य पुरस्कारांसाठी 2क्14 साली या शंभर देशांतून 8क्क् प्रवेशिका दाखल झाल्या. पुरस्कार प्राप्त विजेत्यांना दोन आठवडय़ांच्या ‘हरित कौशल्य - टिकाऊ प्रगतीतील उच्च क्षमतेसाठीचा आंतरराष्ट्रीय मंच’ यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या काळात त्यांनी जर्मनीतील टिकाऊ प्रगती संशोधन व्यवस्थेचे अंतरंग, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती आणि जर्मनीतील आघाडीच्या तज्ज्ञांशी वैयक्तिक भेटीत कल्पनांचे आदानप्रदानही करण्यात आले. (प्रतिनिधी)