Join us

कपिल शर्मा फसवणूकप्रकरणी दिलीप छाब्रियाला पुन्हा अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:13 AM

आणखी ६ तक्रारी दाखल : व्हेनेटी बस बनवून देण्याच्या नावाखाली ५ कोटींचा गंडालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिली ...

आणखी ६ तक्रारी दाखल : व्हेनेटी बस बनवून देण्याच्या नावाखाली ५ कोटींचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पहिली भारतीय स्पोर्ट्स कार बनविणाऱ्या डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना सोमवारी हास्यकलाकार कपिल शर्माची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुन्हा अटक करण्यात आली. मंगळवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कपिल शर्मापाठोपाठ आणखी ६ तक्रारदार पुढे आले आहेत.

एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या राज्यात अनेकदा नोंदणी, स्वतःच तयार केलेल्या कारवर कर्ज घेऊन स्वतः खरेदी करणे, तसेच एका वाहनावर अनेकदा कर्ज घेणे अशा प्रकारचा डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा घोटाळा पोलिसांनी डिसेंबरअखेरीस उघडकीस आणला. कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत छाब्रियाला १८ डिसेंबर रोजी अटक केली. दोन वेळा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर छाब्रिया यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

हा तपास सुरू असतानाच व्हेनेटी बस बनवून देतो, असे सांगून छाब्रिया यांनी ५ कोटी ३२ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार कपिल शर्मा यांनी केली. त्यांच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. या गुन्ह्यात सोमवारी त्याला अटक करण्यात आली. मंगळवाऱी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आणखी सहा तक्रारदार पुढे आले असून त्यांचीही काेट्यवधी रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची तक्रार आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

...........................