Join us  

दिलीप कुमार यांची निर्दोष सुटका

By admin | Published: February 23, 2016 10:26 AM

१८ वर्षापूर्वीच्या जुन्या चेक बाऊंस प्रकरणात गिरगाव सत्र न्यायालयाने महान अभिनेते दिलीप कुमार यांची निर्दोष सुटका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - १८ वर्षापूर्वीच्या जुन्या चेक बाऊंस प्रकरणात गिरगाव सत्र न्यायालयाने महान अभिनेते दिलीप कुमार यांची निर्दोष सुटका केली आहे. दिलीप कुमार दोषी नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयात झालेल्या सुनावणीला दिलीप कुमार हजर नव्हते. 
न्यायालयाने त्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. वयाच्या ९४ व्या वर्षी खटल्याच्या सुनावणीसाठी हजर रहाण्याच्या आदेशावर सोशल मिडीयामधून टीका करण्यात येत होती.  दिलीप कुमार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी तुम्ही प्रार्थना करा. मला तुमचा पाठिंबा हवा आहे असे सायरा बानू यांनी टि्वटसमध्ये म्हटले होते.
 
काय आहे प्रकरण 
डेक्कन सीमेंटस या कंपनीने दिलीप कुमार यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. दिलीप कुमार १९९८ साली कोलकात्यातील जीके एक्जिम इंडिया लिमिटेड  कंपनीत संचालक होते. डेक्कन सीमेंटसने या जीके कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक फेडण्याची वेळ आली. तेव्हा दिलीप कुमार संचालक असलेल्या कंपनीने दोन चेक जारी केले पण ते बाऊंस झाले. त्यानंतर डेक्कन सीमेंटसने दिलीप कुमार यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.