दुकानदारांची नावे इंग्रजीत पाहून दिलीप लांडे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:38 AM2020-01-07T05:38:29+5:302020-01-07T05:38:35+5:30
एम पश्चिम कार्यालयात पालिकेचे अभियंते तसेच अधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या नावांची यादी सादर केली.
मुंबई : एम पश्चिम कार्यालयात पालिकेचे अभियंते तसेच अधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या नावांची यादी सादर केली. पण ही यादी इंग्रजी असल्यामुळे संतापलेल्या आमदार दिलीप लांडे यांनी संताप व्यक्त करत यादी फाडून अधिकाऱ्यांवर भिरकावली. अंधेरी ते कुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भात चेंबूरच्या पालिका उपायुक्तांच्या एम/ पश्चिम विभागामध्ये अधिकाºयांसोबत दिलीप लांडे यांची बैठक होती. ही बैठक सुरू होताच या ठिकाणी सहायक अभियंता अशोक तरडेकर आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी यांनी बाधित असलेल्या दुकानदारांची, गाळेधारकांची इंग्रजीत नावे असल्याची यादी दिलीप लांडे यांच्यासमोर सादर केली. ही यादी इंग्रजीत असल्याचे पाहून दिलीप लांडे यांना संताप अनावर झाला, आणि त्यांनी ही यादी फाडून अधिकाºयांवर भिरकावली. शासन निर्णय असतानादेखील अधिकारी इंग्रजीत कामकाज का करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापुढे कामकाज मराठीत केले नाही तर कठोर भूमिका घेण्याचा इशारा लांडे यांनी पालिका अधिकाºयांना दिला.