शिवसेना प्रवेशामुळे दिलीप लांडेंना लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:00 AM2018-04-07T04:00:49+5:302018-04-07T04:00:49+5:30

मनसेतील सहा नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करणारे दिलीप लांडे यांना अखेर अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. संख्याबळ वाढवून शिवसेनेची सत्ता महापालिकेत भक्कम केल्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे.

 Dilip Lende News | शिवसेना प्रवेशामुळे दिलीप लांडेंना लॉटरी

शिवसेना प्रवेशामुळे दिलीप लांडेंना लॉटरी

Next

मुंबई - मनसेतील सहा नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करणारे दिलीप लांडे यांना अखेर अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. संख्याबळ वाढवून शिवसेनेची सत्ता महापालिकेत भक्कम केल्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. तसेच आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांना वैधानिक समितीचे अध्यक्षपद भूषविता येणार आहे. सुधार समिती अध्यक्षपदी लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मार्च १९९७मध्ये दिलीप लांडे शिवसेनेच्या तिकिटावर कुर्ल्यातून पहिल्यांदा निवडून आले. मात्र २००२मध्ये त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी शैला लांडे शिवसेनेतून निवडून आल्या. २०१२पर्यंत सलग दोन टर्म त्या नगरसेविका होत्या.
२०१२मध्ये दिलीप लांडे यांनी मनसेतून निवडणूक लढवली व ते नगरसेवक झाले. या काळात त्यांनी मनसेत गटनेते पद भूषविले.
२०१७मध्ये ते पुन्हा मनसेच्या तिकिटावर निवडून आले, मात्र काही महिन्यांतच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेला जोरदार धक्का दिला. त्यांच्याबरोबर एकूण सहा नगरसेवकांना पक्षात आणल्याने शिवसेनेत त्यांची पत वाढली. भाजपाबरोबर सुरू असलेल्या सत्तेच्या रस्सीखेचीतूनही त्यांची सुटका झाल्याने शिवसेनेतून त्यांची सुधार समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

Web Title:  Dilip Lende News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.