Join us

दिलीपकुमार अखेर निर्दोष

By admin | Published: February 24, 2016 1:54 AM

चेक न वटल्याबद्दल सुमारे १८ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने बॉलीवूडचे वयोवृद्ध अभिनेते दिलीपकुमार तथा युसूफ खान यांना मंगळवारी मोठा दिलासा

मुंबई : चेक न वटल्याबद्दल सुमारे १८ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने बॉलीवूडचे वयोवृद्ध अभिनेते दिलीपकुमार तथा युसूफ खान यांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. बऱ्याच वर्षांपूर्वी निर्यात व्यापार करण्यासाठी मुंबईत ‘गीके एक्झिम इंडिया लि.’ नावाची कंपनी स्थापन केली गेली होती व दिलीपकुमार त्या कंपनीचे मानद अध्यक्ष होते. कंपनीने लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. तिच्या परताव्यासाठी दिलेले चेक वटले नाहीत तेव्हा दिलीपकुमार यांच्यासह कंपनीशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट््स अ‍ॅक्ट’च्या कलम १३८ अन्वये खटला दाखल केला गेला होता. या खटल्याचा निकाल गिरगाव येथील १४ व्या न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी बी.एस. खराडे यांनी मंगळवारी दिला. कंपनीच्या दैनंदिन व्यवहारांशी मानद अध्यक्ष असलेल्या दिलीपकुमार यांचा कोणताही थेट संबंध नव्हता. त्यामुळे कंपनीने दिलेले चेक न वटल्याबद्दल त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे नमूद करून दंडाधिकारी खराडे यांनी दिलीपकुमार यांना निर्दोष मुक्त केले. प्रकृती अस्वाथ्यामुळे दिलिपकुमार मंगळवारी ते हजर राहू शकले नाहीत व न्यायालयानेही त्यांना गैरहजेरीची औपचारिक सूट दिली. (विशेष प्रतिनिधी)सायरा बानू यांचे आवाहनया जुन्या खटल्याचा मंगळवारी गिरगाव न्यायालयात निकाल आहे, याची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी दिलीपकुमार यांच्याच टिष्ट्वटर हॅण्डलवर टिष्ट्वट करून दिली. ‘साहेबां’ची प्रकृती नाजूक आहे व त्यांना शांतता आणि विश्रांतीची गरज आहे. तरी मानसिक क्लेश होतील असे काही घडू नये यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी, असे आवाहन सायरा बानू यांनी केले.