दिंडोशी सोनार हत्याप्रकरण: मारेकऱ्याची मैत्रीण बनणार माफीचा साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:41 AM2019-05-17T01:41:18+5:302019-05-17T01:41:25+5:30
हेमंत सोनी याला मितेशच्या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.
मुंबई : मालाडमध्ये दागिन्यांच्या कारखान्यात मितेश सोनी या सोनाराची गेल्या शनिवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या त्याच्या माजी बिझनेस पार्टनरची मैत्रीण या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेमंत सोनी याला मितेशच्या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. साकीनाक्यात एका बारमध्ये काम करणाºया आणि मीरा रोड परिसरात राहणाºया बारबालेवर उडविण्यासाठी हेमंतला पैसे हवे होते. त्यासाठीच त्याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या हत्येबाबत त्या बारबालेलादेखील माहिती होती, असा संशय तपास अधिकाºयांना आहे.
तपास अधिकाºयांना असलेल्या या संशयामुळेच तिची चौकशी पोलीस करीत आहेत. या महिलेला माफीचा साक्षीदार बनवत हेमंतविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत ेआहे. जेणेकरून त्याच्या कृत्यासाठी त्याला न्यायालयाकडून कडक शिक्षा मिळाली पाहिजे असे दिंडोशी पोलिसांचे म्हणणे आहे.
मितेशची हत्या करण्यात आली तेव्हा त्याची पत्नी बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे तो कारखान्यात एकटा असणार याची कल्पना हेमंतला होती. त्याचा फायदा घेतच तो मितेशच्या कारखान्यात शिरला आणि काही काळ वाद घातल्यानंतर रागाच्या भरात ठरल्यानुसार हेमंतने त्याची हत्या केली.
हेमंतच्या कुटुंबात कलह निर्माण केल्याचा राग आणि बारबालेवर उडविण्यासाठी त्याला असलेली पैशांची गरज यातूनच निष्पाप मितेशला त्याचा जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे का? याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.