Join us

दिंडोशीच्या निराधार ज्येष्ठांना मिळणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 10:15 PM

राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, असे आहे.

मुंबई- राज्य सरकार जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य करते. ज्यांचे वय ६५ वर्षाच्यावर आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न २१००० रुपयांच्या आत आहे. अशांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत (गट अ ) ६०० रुपये प्रतीमाह निवृत्ती वेतन देण्यात येते. श्रावण बाळ योजना २०२१ चे मुख्य उद्दीष्ट वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे, असे आहे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्यांचे हाल कमी होतील. 

राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणे, असे आहे. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून जेष्ठ नागरिकांच्या खात्यात रक्कम या योजनेअंतर्गत जमा करते.

या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या पाठपुराव्यामुळे दिंडोशी विधानसभा मतदार संघातील हनुमान नगर गाव , मालाड ( पूर्व ) येथे राहणाऱ्या मनोहर भिकाजी पाध्ये व माधुरी मनोहर पाध्ये याना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना या योजनेचे लाभार्थी म्हणून समावेश करण्याला संजय गांधी योजना समितीने मान्यता दिली असून. लाभार्थीना दिनांक ०१/०९/२०२१ या तारखेपासून प्रत्येकी रु १००० ( अक्षरी रु. एक हजार फक्त ) इतके अर्थसहाय्य दरमहा प्रदान केले जाणार आहे. याबाबत पाध्ये दांपत्याने आमदार सुनिल प्रभु यांचे आभार मानले असून, दिंडोशी विधानसभेतील उर्वरित अर्ज केलेल्या जेष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळवा या करता आपण पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी  दिली. 

टॅग्स :मुंबईदिंडोशीराज्य सरकार