दिंडोशीत राजहंस सिंह शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार?

By मनोहर कुंभेजकर | Published: October 18, 2024 03:00 PM2024-10-18T15:00:51+5:302024-10-18T15:01:16+5:30

भाजपाचे विधानपरिषद आमदार राजहंस सिंह यांना दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

Dindoshit Rajhans Singh will contest election from Shinde Sena? | दिंडोशीत राजहंस सिंह शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार?

दिंडोशीत राजहंस सिंह शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार?

मुंबई - दिंडोशी विधानसभा मतदार संघात २०१४ पासून उद्धव सेनेचे सुनील प्रभू हे आमदार आहेत.त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवारच्या शोधात शिंदे सेना आहे. या मतदार संघातून शिंदे सेनेकडून माजी खासदार संजय निरुपम, दिंडोशी विभागप्रमुख गणेश शिंदे, विधानसभा संघटक वैभव भरडकर यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.तर आता भाजपाचे विधानपरिषद आमदार राजहंस सिंह यांना दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

राजहंस सिंग हे २००९ ते २०१४ पर्यंत येथील काँग्रेसचे आमदार तर पालिकेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे सुनील प्रभू यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी आता राजहंस सिंह यांचे नाव पुढे आले आहे. या संदर्भात आमदार राजहंस सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'लोकमत'ला सांगितले की, माझे बॉस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी मला सर्वकाही दिले आहे. त्यांनी जर मला सांगितले की, तुम्ही दिंडोशीतून शिंदे सेनेतून निवडणुकीला लढा, तर मी नक्कीच लढेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

कोण आहेत राजहंस धनंजय सिंह?
राजहंस सिंग हे १९९२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष १९९२ ते १९९७ या काळात ते नगरसेवक होते. नंतर २००२ पासून २०१२ पर्यंत सलग बारा वर्षे ते नगरसेवक होते. या कालावधीत २००४ पासून २०१२ पर्यंत सलग आठ वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पालिकेत कामगिरी बजावली आहे. याच दरम्यान २००९ मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. २००९ ते २०१४ ते विधानसभा सदस्यही होते. २०१७ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Web Title: Dindoshit Rajhans Singh will contest election from Shinde Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.