Join us

Dipali sayyad vs BJP: दिपाली सय्यद विरोध: भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना अश्लील संदेश; पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 6:44 PM

सध्या राज्यात शिवसेना विरूद्ध भाजपा सामना अधिकच तीव्र होताना दिसतोय

Dipali sayyad vs BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील, घाणेरडे संदेश पाठवले जात आहेत का? असा सवाल उपस्थित करत याविरोधात भाजपाच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. या विरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये सर्व पुरावे सादर करून आम्ही दोन वेळा तक्रार नोंदवण्यास गेलो. त्यावेळी चौकशीचे व कायदेशीर सल्ल्याचे निमित्त करत एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवून मला मानसिक त्रास दिला जात आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी निवेदन पाठविले असून महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिव्या ढोले यांनी दिली. तसेच,  प्रगत महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महिलांना अशीच वागणूक मिळणार आहे का? हीच राज्यातील महिला सुरक्षितता आहे का? असे सवाल ढोले यांनी उपस्थित केले.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांहगलेच चर्चेत आलं होतं. त्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, 'किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा... (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल", अशी टीका सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलताना केली होती.

टॅग्स :दीपाली सय्यदनरेंद्र मोदीभाजपाशिवसेना