न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:43 AM2020-04-20T06:43:00+5:302020-04-20T06:43:22+5:30

न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत.

Dipankar Datta named as Bombay HC Chief Justice | न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती

न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती

Next

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली. न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.

‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या २७ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.

Web Title: Dipankar Datta named as Bombay HC Chief Justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.