रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कलाशिक्षण देणारे राज्यातील पदविका अभ्यासक्रम अखेर ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळा’च्या अखत्यारित आले आहेत. या संबंधीच्या अधिनियमांना नुकतीच म्हणजे २३ फेब्रुवारी, २०२४ला मान्यता देण्यात आली.
या संबंधातील विधेयक २०२३च्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील ३१ अनुदानित व १५० विनाअनुदानित कला महाविद्यालये मंडळाच्या अखत्यारित आली आहेत. या महाविद्यालयांतून एकूण १४ विविध पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. ते आता मंडळाअंतर्गत येतील.
मंडळावरील जबाबदारी
- मंडळामार्फत कलाशिक्षण देणाऱ्या संस्थांना संलग्नता दिली जाईल.
- काळानुरूप अभ्यासक्रमात बदल करता येऊ शकतात.
- कला शिक्षणातील पदविकेचा दर्जा राखणे
- उद्योग व परिसंस्था यामधील आदानप्रदान, उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करणे