Join us

नागरी संरक्षण दलाकडून आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम, बचावाबरोबर युवकांना रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 5:25 PM

मानसेवी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या महाराष्ट्र नागरी संरक्षण दलाच्या वतीने (सिव्हील डिफेन्स डायरोक्टरेट) आता राज्यभरातील युवक-युवतींना लवकरच त्याबाबतचे शास्त्रोक्त व अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी आहे.

- जमीर काझीमुंबई : मानसेवी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या महाराष्ट्र नागरी संरक्षण दलाच्या वतीने (सिव्हील डिफेन्स डायरोक्टरेट) आता राज्यभरातील युवक-युवतींना लवकरच त्याबाबतचे शास्त्रोक्त व अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी आहे. इमारतीला आग लागल्यास किंवा ती कोसळण्याच्या दुर्घटनावेळी बचाव व मदत कार्याबाबतचा एक वर्षाचा पदवीत्यूर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभिनव उपक्रमामुळे दुर्घटनाना प्रतिबंध लागण्याबरोबरच बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव संचालनालयाचे संचालक संजय पाण्डेय यांनी प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास नवीन शैक्षणिक वर्षापासून तो कार्यान्वित होऊ शकणार आहे. गेल्या काही महिन्यात महानगर मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी इमारतीला आग, पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामध्ये वित्त व प्रांपचिक साहित्याच्या हानीबरोबरच नागरिक त्यामध्ये अडकून मृृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाला बचाव व मदत कार्य, प्राथमिक उपचाराची माहिती असणे अत्यावश्यक बनले आहे.‘सिव्हील डिफेन्स’च्यावतीने मुंबईतील प्रशिक्षण महाविद्यालयाच्यावतीने पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठरविण्यात आले, त्यासाठी उच्च व तंशिक्षण विभागातील अधिका-यांशी चर्चा करून अभ्यासक्रमाची रुपरेषा निश्चित कर-यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर तरुण, तरुणीला एक वर्षाचा आपत्ती निवारणाबाबतचा पदविका अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता नसून प्रशिक्षणार्थीकडून आकारण्यात येणा-या शुल्कातून प्रशिक्षणासाठीचा खर्च निघू शकणार आहे. हा अभ्यासक्रम भविष्यात नागरिकांना संरक्षणाबरोबरच या क्षेत्रात करियर करू इच्छिणा-यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.-----------------नागरी संरक्षण दलाकडून सध्या मानसेवी तत्त्वावर काम करणा-यांना आपत्ती निवारणाबाबतचे पाच दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर प्रगत प्रशिक्षणाचे प्रत्येकी सहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. ते पूर्ण केलेले विविध सिक्युरिटी संस्थांकडे काम करीत आहेत. आता एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यास संबंधितांना सुरक्षेबाबत चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.----------------उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध महाविद्यालयातील अध्यापकांच्या बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा पदविका अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागृती होण्याबरोबरच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.- संजय पाण्डेय ( संचालक ,नागरी सुरक्षा संचालनालय, महाराष्ट्र राज्य)