अमृत आहार योजनेचा निधी थेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:10+5:302021-01-20T04:07:10+5:30

- महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर अमृत आहार योजनेचा निधी थेट एकात्मिक बाल विकास योजनेकडे द्यावा - यशोमती ...

Direct funding of Amrut Ahar Yojana | अमृत आहार योजनेचा निधी थेट

अमृत आहार योजनेचा निधी थेट

Next

- महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

अमृत आहार योजनेचा निधी थेट एकात्मिक बाल विकास योजनेकडे द्यावा

- यशोमती ठाकूर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा निधी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधी योजनेमधून दिला जात होता. याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने अमृत आहाराचे वितरण योग्यरित्या होण्यासाठी हा निधी थेट एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला द्यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

अमृत आहार योजनेबाबत आढावा बैठक मंगळवारी मंत्रालय येथे घेण्यात आली. यावेळी अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. बालकांच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णत: मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहाणे आवश्यक आहे. ही योजना आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, याअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी व योजनेसाठीच्या निधीचे वितरण योग्यरित्या करावे, असे निर्देश त्यांनी दिले. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक गाव सामावून घेण्यात येईल. यासाठी आदिवासी विकास विभागाने आपली कार्यप्रणाली सादर करावी. निधी वितरणामध्ये सुधारणा करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

.......................................................

Web Title: Direct funding of Amrut Ahar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.