आझाद मैदानातून थेट 'सिल्वर ओक'वर...कर्मचारी आत कसे घुसले? जाणून घ्या एसटी आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:59 AM2022-04-09T05:59:27+5:302022-04-09T06:00:02+5:30

एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्वरओकवरील आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम कसा होता जाणून घ्या...

Directly from Azad Maidan on Silver Oak How did the st workers get inside whole story of the ST movement | आझाद मैदानातून थेट 'सिल्वर ओक'वर...कर्मचारी आत कसे घुसले? जाणून घ्या एसटी आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

आझाद मैदानातून थेट 'सिल्वर ओक'वर...कर्मचारी आत कसे घुसले? जाणून घ्या एसटी आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

googlenewsNext

३.३० : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन सिल्व्हर ओकजवळ आंदोलनास सुरू केले.
३.३७ : एसटीचे विलीनीकरण झालेच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार करीत कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या दिशेने दगडफेक आणि चप्पलफेक सुरू केली.
३.५० : आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी सुप्रिया सुळे निवासस्थानाबाहेर आल्या. त्यांनी शांततेचे आवाहन करूनही घोषणा सुरूच राहिल्या.
४.०५ : कायदा व सुव्यवस्थापन सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आंदोलनस्थळी दाखल.
४.१२ : पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेले.
५.२४ : आझाद मैदानाभोवती पूर्णपणे बॅरिकेडिंग करण्यात आले.
६.२८ : आंदोलनकर्त्यांना घरी जाण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन.

पवारांच्या घरी जाण्याचा ‘प्लॅन’ बाहेर ठरला
- एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरूच असले तरी शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा ‘प्लॅन’ बाहेर ठरला; आझाद मैदानात बसलेले आंदोलक त्याविषयी पूर्णत: अनभिज्ञ होते, अशी माहिती काही एसटी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

- शुक्रवारी सकाळपासून कर्मचारी आझाद मैदानात शांततेत बसले होते. न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते त्याचे वाचन करतील आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते, पण दुपारी कोण कर्मचारी बाहेर गेले, त्यांनी काय केले, याविषयी आम्हाला काहीही माहिती नव्हती. किंबहुना ते असे काही करणार आहेत, याची कल्पनाही नव्हती.असे या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

- दुसरीकडे, पवारांच्या घराबाहेर आंदोलन सुरू होताच पोलिसांच्या काही तुकड्या आझाद मैदानात दाखल झाल्या. पोलीस बळाचा वापर करून कर्मचाऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला; परंतु पोलीस अधिकाऱ्यांना सत्यस्थिती कथन केल्यानंतर कारवाई थांबली, अशी माहितीही या कर्मचाऱ्यांनी दिली. 

Web Title: Directly from Azad Maidan on Silver Oak How did the st workers get inside whole story of the ST movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.