Join us

थिएटर ऑफ आर्ट्सच्या व्हिजिटिंग फॅकल्टीला प्रभारी संचालकांचा ‘दे धक्का’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:35 AM

योगेश सोमण यांच्यावरील कारवाई आणि संबंधित प्रकरण सुरू असतानाच विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्समध्येच नवीन अंकाचा प्रयोग पाहायला मिळत आहे.

मुंबई : योगेश सोमण यांच्यावरील कारवाई आणि संबंधित प्रकरण सुरू असतानाच विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्समध्येच नवीन अंकाचा प्रयोग पाहायला मिळत आहे. सोमण यांनी नियुक्त केलेल्या व्हिजिटिंग फॅकल्टीलाही आता सोमण यांच्यावरील कारवाईचा फटका बसत आहे. अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आटर््समध्ये विद्यार्थ्यांना काही विषय शिकविण्यासाठी इंडस्ट्रीचा अनुभव असलेल्या काही व्यक्तींची फॅकल्टी म्हणून नियुक्ती सोमण यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र त्यातील काही फॅकल्टीजना अचानक तुम्ही शिकविण्यास येऊ नका, असे प्रभारी संचालकांकडून सांगण्यात आल्याचे समोर आले आहे.शिकवणीच्या कामाला अचानक स्थगिती का देण्यात आली, याची कारणे विद्यापीठ प्रशासन आणि प्रभारी संचालकाकांकडून देण्यात न आल्याने या व्हिजिटिंग फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचा निषेध म्हणून अभाविपने मुंबई विद्यापीठाकडे चौकशी समिती नेमून सर्व प्राध्यापकांच्या अर्हता तपासण्याची तसेच जे पात्र नसतील त्यांना घरी पाठविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मात्र नवे प्रभारी संचालक गणेश चंदनशिवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर योगेश सोमण यांनी नेमलेल्या या फॅकल्टीच्या नोकरीवर गदा आल्याचे समोर आले आहे.

 

टॅग्स :मुंबई