जमीर काझी
मुंबई : गेल्या काही दिवसांत खाकी वर्दीची लक्तरे वेशीवर टांगणा-या घटना सातत्याने घडत असल्याने, त्याला प्रतिबंधासाठी आता राज्यातील सर्व आयुक्त, विशेष महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांची झाडाझडती घेतली जाईल. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी येत्या शुक्रवारी (दि.२४) वरिष्ठ अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे. पोलिसांतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिस्तीचे पाठ देण्याबरोबरच, संबंधितावर तातडीने कडक कारवाईच्या सूचना दिल्या जाणार आहेत.सांगलीत पोलीस कोठडीत तरुणाची निर्घृण हत्या, लातूर व वसईत उपअधीक्षक कार्यालयातील आत्महत्या, औरंगाबाद पोलिसांकडून करण्यात आलेल्या राजकीय पोस्टरबाजी या विषयावर प्रामुख्याने संबंधित घटकप्रमुखांकडून जाब विचारला जाणार असल्याचे सांगण्यात येते. सांगली पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अटक केलेल्या अनिकेत कोथळेची, त्याच रात्री उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी अमानुष मारहाण करून हत्या केली. त्यानंतर, अंबोली घाटात नेऊन त्याचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस दलाची मोठी बदनामी झाली असून, सांगलीतील अधीक्षक दत्ता शिंदे, महिला उपअधीक्षक रूपाली काळे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. अधिकाºयांवर कारवाईसाठी सांगली बंद करण्यात आले. त्याबाबत नागरिकांमध्ये संताप आहे. तर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या केसेसमुळे वसईत उपअधीक्षक कार्यालयात एकाने पेटवून घेऊन आत्महत्या केली. तर, चोरी प्रकरणी अटक व्यापाºयाने, लातूर पोलीस कोठडीत अॅसिड प्राशन केले.काहींच्या गैरकृत्यामुळे समस्त पोलीस दलाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. दरम्यान, पंधरवड्यापूर्वी मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौºयावर असताना, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या स्वागताचे बॅँनर शहरात लावले. या बेशिस्तपणाबाबत सर्व स्तरातून टीकेची झोड उठली .>मार्गदर्शन करणारकाही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांना तपास व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील सर्व घटकप्रमुख व विशेष महानिरीक्षकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.- सतीश माथूर, पोलीस महासंचालक