महासंचालकांचा ‘ओआर’ आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 06:19 AM2020-07-14T06:19:57+5:302020-07-14T06:20:15+5:30

पूर्वीप्रमाणे दर शुक्रवारी दुपारी तीन ते चार या वेळेत ही व्हीसी चालणार आहे. मात्र त्यासाठी संबंधितांना आपल्या घटकप्रमुखामार्फत त्याच्याकडे दाद मागावी लागणार आहे.

Director General's 'OR' now via video conference! | महासंचालकांचा ‘ओआर’ आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे!

महासंचालकांचा ‘ओआर’ आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे!

Next

- जमीर काझी

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य पोलीस मुख्यालयातील आग्यांकित कक्षात (ओआर) आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) घेण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांकडून आता राज्यभरातील विविध पोलीस घटकात कार्यरत असलेल्या अधिकारी-अंमलदारांची कैफियत व समस्या आॅनलाइन ऐकून त्या मार्गी लावल्या जातील. पूर्वीप्रमाणे दर शुक्रवारी दुपारी तीन ते चार या वेळेत ही व्हीसी चालणार आहे. मात्र त्यासाठी संबंधितांना आपल्या घटकप्रमुखामार्फत त्याच्याकडे दाद मागावी लागणार आहे.
पोलीस दलात काम करीत असलेल्या अधिकारी-अंमलदारावर खात्यात होत असलेला अन्याय, सेवेतील अडीअडचणी, बढती, बदलीतील समस्या ज्या स्थानिक पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकस्तरावर मार्गी लागू शकत नाहीत, अशा समस्या मुख्यालयातील डीजी किंवा आस्थापना विभागातील अप्पर महासंचालक, विशेष महानिरीक्षकांकडे मांडण्याची संधी असते. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणाºया भेटीला आग्यांकितकक्ष (ओआर) असे संबोधले जाते. त्यासाठी आठवड्यातील एक दिवस राखून ठेवण्यात आला असला तरी समस्या घेऊन आलेल्या अधिकारी-अंमलदारांना भेटायचे की नाही, हे वरिष्ठ अधिकाºयाच्या मर्जीवर अवलंबून असते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुख्यालयातील हा ‘ओआर’ मार्च महिन्यापासून बंद आहे. संसर्ग टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र पोलिसांना आपल्याला समस्या मांडण्यासाठी वरिष्ठ उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अन्य महत्त्वाचे विषय ज्या पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित घटकांत चर्चा करून सोडविले जातात. त्याप्रमाणे ‘ओआर’ घेण्याचा निर्णय महासंचालक सुबोध जायसवाल यांनी घेतला आहे. त्यासाठी सर्व घटकप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी अर्जाची तपासणी करून आवश्यकतेनुसार मुख्यालयात पाठवावयाचे आहेत.

Web Title: Director General's 'OR' now via video conference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई