दिग्दर्शक करण जोहर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, घरातील दोघे कोरोना पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 23:04 IST2020-05-25T23:04:20+5:302020-05-25T23:04:38+5:30
आता, पुढील १४ दिवसांसाठी आम्ही स्वत: अलगीकरण करुन घेतल्याचेही करणने सांगितले.

दिग्दर्शक करण जोहर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, घरातील दोघे कोरोना पॉझिटीव्ह
मुंबई - राजधानी मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असून तो आता राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कालच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर रात्री नांदेडमध्ये त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर, आज दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नोकरांचे रिपोर्ट येताच त्या दोघांनाही घराच्या बिल्डींगमधील वेगळ्या भागात ठेवण्यात आल्याची माहिती स्वत: करण जोहरने दिली.
करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, घरातील नोकरांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन झाल्याचे सांगितले आहे.तसेच यासंदर्भात बीएमसी माहिती दिल्यानंतर संपूर्ण बिल्डिंगमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आता, पुढील १४ दिवसांसाठी आम्ही स्वत: अलगीकरण करुन घेतल्याचेही करणने सांगितले. तसेच, घरात काम करणाऱ्या इतर नोकरांचे आणि सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याचेही करणने सांगतिले आहे. करणने, एक पत्रक प्रकाशित करत यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील नोकरांनाही कोरोनाची लागण झाल्याची समोर आले होते.
— Karan Johar (@karanjohar) May 25, 2020
विशेष म्हणजे करण जोहरने आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला असून सर्वांनी करणला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, वाढदिनीच कोरोनाने करणच्या घरात शिरकाव केल्याने कुटुंबातील सदस्यांची मित्रपरिवाराला चिंता वाटत आहे. अनेकांनी करणला ट्विटरवरुन धीर दिला आहे.