दिग्दर्शक कोटवाला हल्ला प्रकरण : लकडावालाची शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:58 AM2018-01-30T05:58:28+5:302018-01-30T05:58:41+5:30

दिग्दर्शक व कच्छी मेमन जमात संस्थेचे विश्वस्त अब्दुल माजी कोटवाला यांच्यावर हल्ला करणारा इर्शद लकडावालाने सोमवारी पायधुनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली आहे.

Director Kotwala attack case: surrender of Lakdawala | दिग्दर्शक कोटवाला हल्ला प्रकरण : लकडावालाची शरणागती

दिग्दर्शक कोटवाला हल्ला प्रकरण : लकडावालाची शरणागती

Next

मुंबई : दिग्दर्शक व कच्छी मेमन जमात संस्थेचे विश्वस्त अब्दुल माजी कोटवाला यांच्यावर हल्ला करणारा इर्शद लकडावालाने सोमवारी पायधुनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याला मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली आहे.
पायधुनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ तारखेला पायधुनीतील कांबेकर मार्गावरील जमातखानामध्ये कच्छी मेमन जमात संस्थेची बैठक सुरू होती. दिग्दर्शक कोटवाला या संस्थेचे विश्वस्त आहेत. लकडावालाही या संस्थेचा सदस्य आहे. बैठकीदरम्यान लकडावाला व त्याच्या नातेवाइकांची कोटवाला यांच्यासोबत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. लकडावालासह त्याच्या ४ ते ५ साथीदारांनी त्यांना मारहाण केली. अन्य साथीदारांच्या मदतीने कोटवाला यांची सुटका करण्यात आली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
लकडावालासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Director Kotwala attack case: surrender of Lakdawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.