Join us

यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहतांना निर्देश- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:14 AM

मुंबई : यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि रेल्वेच्या संबंधित अधिका-यांना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिले आहेत.

मुंबई : यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि रेल्वेच्या संबंधित अधिका-यांना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिले आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक परिसरामधील फेरीवाल्यांसह वृत्तपत्र विक्रेत्यांवरही रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला होता. या संदर्भात बृहन्मुबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान वृत्तपत्र विक्रेता संघाने १९९९ साली मुंबई महापालिकेने काढलेल्या परिपत्रकाची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली. त्यावर पुन्हा नव्याने परिपत्रक काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना दिले. या भेटीच्या वेळी शिष्टमंडळात अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह सरचिटणीस हरी पवार, कार्याध्यक्ष मधुसुदन सदडेकर, उप कार्याध्यक्ष जयवंत डफले, रवि चिले, भाऊ राणे, संजय पावसे, राजू धावरे, वैभव म्हात्रे, दिलीप चिंचोले, मधू माळकर, मनोहर परब आणि अरुण जाधव उपस्थित होते.